राजेश मोरे
विकास प्रभागाचा विकास सर्वांचा


परिचय
राजेश मोरे हे एक प्रामाणिक, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्यरत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि विकासात्मक विचार ही त्यांच्या कार्याची ओळख आहे.


आमचे काम
प्रभागातील महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येऊन स्वतःचा रोजगार स्वतः उपलब्ध करावा या उद्देशाने महिलांना मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण व रिक्षा वाटप करण्यात आले.




प्रभागातील १० वी आणि १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यान गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत एसटी बस सेवा दरवर्षी उपलब्ध करून दिली जाते.
"जागतिक महिला दिनानिमित्त" दरवर्षी प्रभागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो तसेच, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येते.


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने दरवर्षी दिवाळी निमित्त "गड किल्ले बनविणे" स्पर्धा आयोजित करण्यात येते. सहभागी स्पर्धकांना दरवर्षी एका किल्ल्यावर नेऊन तेथे बक्षीस समारंभ केला जातो. सन २०२५-२६ मध्ये "किल्ले रायगड" येथे हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
“पाऊस-वारा, दिवस-रात्र न पाहता जमिनीवर राहून २४/७ काम”


महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येऊन उद्योगाकडे वाटचाल करावी या उद्देशाने महिला बचत गटासाठी "दिवाळी बाजार" चे आयोजन करण्यात आले.




मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रभागामधील सुशिक्षित बरोजगार तरुण-तरुणींना व्यावसायिक वाहने आणि फिरती विकी केंद्र वाहनाचे वाटप करण्यात आले.
कोविड मध्ये प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले.
“महिला व मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवणारे आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले.”


''आनंदपथ - जत्रा आरोग्याची" या लोकप्रिय उपक्रमाचे आयोजन खास नागरिकांच्या आरोग्यासाठी पाचपाखाडी परिसरात दरवर्षी केले जाते त्यामध्ये तलवारबाजी, लाठीकाठी, योगा, स्केटिंग, झुम्बा, मलखांब, जिमनॅस्टीक, सायकलिंग, लंगडी, भरतनाट्यम, हास्य क्लब, आट्यापाट्या व इतर अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात येते.
“नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वॉर्डमधील सर्वांसाठी मोफत आणि सर्वसमावेशक आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली.”

